तब्बूच्या लग्न न करण्यामागे आहे एक खास कारण


अभिनेत्री तब्बूने हम नौजवान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने तिच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. तब्बूने हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली आणि हॉलिवूड चित्रपटही केले आहेत. पण अनेक सुपरहिट चित्रपट देणारी ही अभिनेत्री अजूनही अविवाहित असल्यामुळे तिला अनेक वेळा तिच्या लग्नासंदर्भात प्रश्न विचारण्यात येतात. तिला यावेळीदेखील असाच प्रश्न विचारण्यात आला होता. पण या प्रश्नाचे उत्तर चक्क अभिनेता अजय देवगणने दिले आहे.

तब्बूने अनेक वेळा लग्नासाठी योग्य व्यक्ती मिळत नसल्यामुळे मी लग्न करत नाही, असे सांगितले आहे. पण अजयने तब्बूच्या लग्न न करण्यामागे एक वेगळेच कारण असल्याचे सांगितले. अजयने या गोष्टीचा खुलासा काही दिवसांपूर्वी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान केला.

माझ्यासारखा मुलगा आजपर्यंत तब्बूला न मिळाल्यामुळेच अजूनही ती अविवाहित असल्याचे मजेशीर उत्तर अजयने यावेळी दिले. जरी हे उत्तर अजयने मजेशीर अंदाजात दिले असले तरी तब्बू खरच लग्न का करत नाही ? हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्कीच पडला असावा. दरम्यान, नुकताच तब्बू आणि अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेला ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. तब्बू या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Leave a Comment