एकदम सोप्या पद्धतीने घरबसल्या अपडेट करा आपले आधार कार्ड


नवी दिल्ली – आधार कार्डला नवीन मोबाइल नंबर अपडेट करण्याची ऑनलाइन प्रक्रिया आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर आधार सेंटरवर जाण्याचा कटकटीपासून तुम्हाला बचाव करायचा असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. resident.uidai.gov.in या वेबसाइटवर यासाठी तुम्हाला जावे लागले. तुम्ही या प्रोसेसद्वारे तुमचा ईमेल आयडी, पत्ता, मोबाइल नंबर इत्यादी बदलू शकता.

यासाठी https://resident.uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वरील तिसऱ्या क्रमांकावरील aadhar update वर क्लिक करा. यानंतर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये खालच्या बाजुला Request For Adhar Update च्या खाली update Aadhar details online या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर आणखी एक नवीन पेज ओपन होईल. तेथे Click Here वर क्लिक करा. येथे एखादी जाहीरात देखील दिसेल त्याकडे दुर्लक्ष करा.

एक नवीन पेज समोर आल्यानंतर यामध्ये तुमचा आधार नंबर टाका आणि Text Verfication नंतर Send OTP वर क्लिक करा. मोबाइलवर आलेला OTP टाकून login वर क्लिक करा. यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला जे अपडेट करायचे आहे तो ऑप्शन निवडावे लागेल. यामध्ये मोबाइल नंबर निवडा. मोबाइल नंबर टाकून submit update req uest वर क्लिक करा. आता नंबर व्हेरिफाय करून प्रोसिड वर क्लिक करा. यानंतर तुमचा मोबाइल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

Leave a Comment