संजय लीला भंसाळींच्या आगामी चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर रिलीज


भव्य दिव्य चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्गज दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भंसाळी यांनी बॉलीवूडला आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यातच ते आता एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.


या चित्रपटाचे नाव मलाल असे असून नुकतेचे या चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. शर्मिन शेगल आणि मिझान जाफरी यांची खास रोमॅन्टिक केमेस्ट्री या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटातून संजय लीला भंसाळींची बहिण बेला सेगल यांची मुलगी शर्मिन सेगल आणि जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

आज या चित्रपटाचा ट्रेलरदेखील रिलीज केला जाणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. या चित्रपटाची निर्मिती संजय लीला भंसाळी, भूषण कुमार, महावीर जैन आणि क्रिशन कुमार करणार असून दिग्दर्शन मंगेश हाडवळे यांचे असणार आहे. हा चित्रपट येत्या २८ जुनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment