‘बिग बॉस मराठी’चा दुसऱ्या सीजनचे सुत्रसंचालनासाठी महेश मांजरेकर सज्ज


पहिल्या पर्वाला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या पर्वाप्रमाणेच महेश मांजरेकरच दुसऱ्या पर्वाचे सुत्रसंचालन करणार आहेत. पण पहिल्या पर्वाच्या वेळी मनात असलेली धाकधूक यावेळी कमी झाल्याने या पर्वासाठी कोणतीच पूर्वतयारी करणार नसल्याचे मांजरेकर यांनी सांगितले आहे.

जसे पहिल्या पर्वामध्ये स्पर्धक वागत गेले मी तसाच वागत गेलो, असे त्यांनी म्हटले आहे. या शोची खासियत तो कसा घडत जातो त्यातच आहे. त्यामुळेच यावेळी घर कसे आहे, घरात नक्की कोण कोण असेल आणि त्यांना मी कसा हाताळणार याचे काहीच ठोकताळे तयार केले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment