विश्वचषक स्पर्धेसाठी केदार जाधव फिट


मुंबई – भारतीय संघ २२ मे रोजी सकाळी इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. भारतीय संघासाठी तत्पूर्वी खुशखबर आली असून बेस्ट फिनिशर केदार जाधव याला फिट घोषित करण्यात आले आहे.

केदार जाधव दुखापत झाल्यानंतर भारतीय संघाचे फिजियो पॅट्रिक फरहत यांच्या देखरेखीखाली होता. तो मागील दोन आठवड्यांपासून मुंबईत उपचार घेत होता. बीसीसीआयला गुरुवारी सकाळी फरहत यांनी जाधवचे रिपोर्ट पाठविले होते. त्यानंतर बीसीसीआयने आज त्याला फिट घोषित केले.

आयपीएलमध्ये मधल्या फळीत फलंदाजी करणारा ३४ वर्षीय केदार जाधवला दुखापत झाली होती. ही दुखापत पंजाब विरुद्धच्या सामन्यात थ्रो करताना झाल्यामुळे त्याच्या विश्वचषकात खेळण्यावर प्रश्नचिन्ह होता. तो इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकात भारतीय संघात खेळणार आहे.

केदार जाधव अनफिट झाल्यास त्याच्या जागी ऋषभ पंतला घेण्याची मागणी पुढे येत होती. केदार जाधव फिट झाल्याने विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी पंतला अजून वाट बघावी लागणार आहे.

Leave a Comment