ब्लेड, जगातील पहिली थ्री डी प्रिंटेड हायपरकार


लॉस एंजेलिस येथील स्टार्टअप कंपनी डीवरजेन्ट ने जगातील पहिली थ्री डी प्रिंटींग तंत्रज्ञानाने बनविलेली हायपर कार ब्लेड नावाने सादर केली असून ही कार ० ते १०० चा वेग फक्त २ सेकंदात घेते. या कारमध्ये थ्री डी बरोबरच एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात आला आहे. या कारची बॉडी एरोस्पेस ग्रेड कार्बन फायबर व अॅल्युमीनियम अॅलॉय पासून बनविली गेली आहे. कंपनीने ब्लेड बनविताना थ्रीडी प्रिंटींग तंत्रज्ञानाची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे. ही कार काही मिनिटात असेम्बल करता येते. या कारला २.४ लिटरचे टर्बोचार्ज्ड ४ सिलिंडर इंजिन आणि ६ स्पीड ट्रान्समीशन दिले गेले आहे.

ही कार पूर्णपाने रोड लीगल आहे त्यामुळे रस्त्यावरून चालविता येणार आहे. या कारला फोर व्हील ड्राईव्ह असून चासीचे वजन फक्त ४६ किलो आहे. पारंपारिक कार मध्ये वापरल्या जाणाऱ्या चासी पेक्षा हे वजन ९० टक्के कमी आहे. कारचे डिझाईन विमानावरून प्रेरणा घेऊन बनविले गेले आहे. कारची केबिन जेट प्लेनच्या धर्तीवर असून सेन्ट्रल सिटींग पोझिशन आहे. चासी हलकी बनविण्यासाठी थ्री डी प्रिंटेड अल्युमिनियम जॉइंट कार्बन फायबर ने बनविलेल्या ट्यूबने जोडले गेले आहेत.

२०१७ मध्ये डीवरजेन्ट कंपनीत हाँगकाँगचा अब्जाधीश लिका शिंग यांनी ६५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ही कंपनी ऑटो उद्योगासती पार्टस बनवितेच पण त्यात कमी खर्च आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यावर भर दिला जातो. ब्लेडचे प्रोटोटाइप मॉडेल डीटेल्स २०१५ मध्येच जगासमोर आले होते.

Leave a Comment