भाजप खासदाराकडून राजीव गांधींची गोडसे व कसाबशी तुलना


नवी दिल्ली – नथुराम गोडसे व अजमल कसाब यांच्याशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तुलना भाजप खासदार नलीन कतील यांनी केली आहे. १७ हजार लोकांना राजीव गांधींनी मारले. नथूराम गोडसे यांनी एकाला तर कसाबने ७२ जणांना मारले तुम्हीच आता ठरवा सर्वाधिक क्रूर कोण होता? असे ट्विट भाजप खासदार नलीन कुमार कतील यांनी केले.

त्यांच्या या ट्विटमुळे आता त्यांच्यावर चौफेर टीका होत असल्यामुळे ते ट्विट त्यांनी डिलीट केले आहे. कोणाच्या भावना माझ्या ट्विटमुळे दुखावल्या असल्यास मी त्यांची माफी मागतो, असे नलीन कुमार यांनी म्हटले आहे.

महात्मा गांधी, नथुराम गोडसे यांच्याबाबत प्रज्ञासिंह ठाकूर, अनंतकुमार हेगडे, मध्य प्रदेशातील भाजप नेते अनिल सौमित्र यांच्यानंतर आता भाजप खासदार नलीन कतील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कमल हसन यांच्या गोडसे वक्तव्यानंतर सुरु झालेला वाद थांबताना दिसत नाही.

Leave a Comment