गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहेत विरुष्का


गोवा – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का आयसीसी विश्वचषक स्पर्धेपूर्वी स्वत:ला रिफ्रेश करण्यासाठी गोव्याला गेले आहेत. सोशल मीडियावर विराट आणि अनुष्काचे गोव्यातील फोटोही व्हायरल झाले आहेत. विराट या फोटोत एका हॉटेलामध्ये अनुष्का आणि त्याच्या मित्रासोबत ब्रेकफास्ट करताना दिसत आहे.

विराट कोहली आयपीएलनंतर मिळालेला वेळ अनुष्कासोबत व्यतीत करत आहे. चित्रपटातून अनुष्कानेही काही वेळासाठी ब्रेक घेतला आहे. दुसरीकडे मालदीव येथे रोहित शर्माही पत्नी आणि कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली यंदा मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला आहे.

यंदाचा आयपीएल मोसम विराटसाठी निराशाजक राहिला. प्ले ऑफमध्ये त्याचा बंगळुरूचा संघ स्थानही मिळवू शकला नाही. सततच्या पराभवामुळे विराटच्या नेतृत्वावर बोट ठेवण्यात येत आहे. ३० मेपासून विश्वचषकास सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे.

Leave a Comment