
दुबई – आयसीसीने इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी समालोचकांची यादी जाहीर केली असून तीन भारतीय खेळाडूंना या यादीत संधी देण्यात आली आहे. कॉमेंट्री पॅनलमध्ये सौरव गांगुली, संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले यांना जागा देण्यात आली आहे.

मागचा विश्वचषक ऑस्ट्रेलियाला जिंकून देणाऱ्या मायकल क्लार्क हा देखील समालोचकाच्या भूमिकेत दिसेल. त्याचबरोबर माजी सलामीवीर मायकल स्लेटर, मार्क निकोलस, नासिर हुसेन, इयान बिशप, मेलेनी जोंस, कुमार संगकारा, माइकल आथरटन, अलिसन मिशेल, ब्रँडन मॅक्युलम, ग्रीम स्मिथ, वसीम अकरम सारखे दिग्गज खेळाडू विश्वचषकात समालोचन करताना दिसून येतील.
आयसीसीच्या विश्वचषकासाठी समालोचकांच्या यादीत ३ भारतीयांचा समावेश
तसेच शॉन पोलॉक, मायकल होल्डिंग, ईशा गुहा, पोमी मांग्वा, सायमन डाउल, ईयान स्मिथ, रमीज राजा, अथर अली खान आणि इयान वार्ड यांनादेखील संधी मिळाली आहे. ३० मे ते १५ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा खेळविली जाईल. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
