‘या’ क्रिकेटपटूंच्या पत्नींसमोर सुपर मॉडेल्सदेखील फिक्या


क्रिकेट हा खेळ आता जगभरातील बहुतांशी देशात खेळला जातो. त्याचबरोबर तेथील खेळाडू कोणत्या ना कोणत्यातरी खेळाडूला आपला आयडॉल मानतात. पण जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये जेवढी चर्चा त्या क्रिकेटपटुची होते, त्याच्यापेक्षा त्याच्या बायकोची जास्त चर्चा होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही क्रिकेटपटुंच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या समोर सुपर मॉडेल्स देखील फिक्या पडतील. चला तर जाणून घेऊया कोण-कोणत्या आहेत त्या सुपर पत्नी…

काही वर्षांच्या रिलेशननंतर टीम इंडियाचा सगळ्या फॉर्मेटमधील कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे विवाहबद्ध झाले. बॉलीवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री असलेली बहुतेक वेळा विराटसाठी क्रिकेटच्या मैदानावरही दिसते.

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉ़डची पत्नी बीली मिशेल ही एक मॉडेल असून बीली मिशेल सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरची पत्नीसुद्धा मॉडेल आहे. कॅडिस एन फालजोन असे तिचे नाव आहे.

आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा फलंदाज आंद्रे रसेल याची पत्नी पत्नी जस्सीम लोरा ही सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

बॉलीवूड अभिनेत्री आणि ब्रिटिश मॉडेल असलेल्या हेजल किच हिच्याशी 2016 मध्ये भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंहने लग्न केले. हॅरी पॉटर 2, 3, 4 मध्ये तिने काम केले होते.

गायिका असलेल्या जेसिका टेलरशी केविन पीटरसनने लग्न केले आहे. ती मॉडेल आणि डान्सरही आहे. युरोपातील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘ब्रिट’ पुरस्कार तिला मिळाला आहे.

भारताचा क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीसोबत टीव्ही स्पोर्ट्स जर्नालिस्ट असलेल्या मयंती लँगरने लग्न केले. 2011 आणि 2015 चा वर्ल्ड कप मयंतीने होस्ट केला होता.

सू इरासमस हिच्याशी दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू जे पी ड्युमिनीने लग्न केले. ती एक मॉडेल असून 2011 मध्ये दोघांनी लग्न केले आहे.

उम्मे अहमद शिशिर हिच्याशी बांगलादेशचा शाकिब अल हसनने 2012 मध्ये लग्न केले. अमेरिकन असलेल्या उम्मेने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने 2010 मध्ये लग्न केले. आशियातील प्रसिद्ध टेनिसपटू असलेल्या सानियाने अनेक स्पर्धांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे.

Leave a Comment