पत्नीच्या आरोपाचे नवज्योत सिंह सिद्धू यांनी केले समर्थन


चंदिगड – पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रभारी यांच्यावर काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीने केलेल्या आरोपाच्या समर्थनार्थ पती नवज्योत सिंह सिद्धूही सरसावले आहेत. कधीही खोटे माझी बायको बोलत नाही. नैतिकतेने ती मजबूत असल्याचे प्रत्युत्तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले आहे. काही दिवसांपूर्वी नवजोत कौर सिद्धू यांनी केलेल्या आरोपावर पंजाबचे पर्यटनमंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता त्यांनी त्यावर हे उत्तर दिले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि काँग्रेसच्या नेत्या आशा कुमारी यांच्यावर अमृतसरमधून तिकीट न दिल्याबद्दल नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी आरोप केला होता. पण त्यांचे आरोप मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी फेटाळून लावले आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, अमृतसर किंवा भटिंडा या लोकसभा जागेवरुन नवजोत कौर सिद्धू यांना लढण्याचा आग्रह केला होता. पण त्यांना त्यास नकार दिला. तसेच माझी नवजोत कौर सिद्धू यांना तिकीट न देण्याबाबत कोणतीही भूमिका नाही, कारण तिकीट वाटपाचे काम काँग्रेस हायकमांड करते.

मला लोकसभा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पंजाब काँग्रेस प्रभारी आशा कुमारी यांच्यामुळे तिकीट नाकारले गेले. अमृतसर आणि चंदीगड लोकसभा जागेसाठी मी मागणी केली होती. पण पक्षाने माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केले. अमृतसरमधून मी निवडून येऊ शकत नाही असे आमचे मुख्यमंत्री आणि आशा कुमारी यांनी सांगितल्यानंतरच माझे तिकीट नाकारले गेले. पण जर पक्षाचे मी काम करत असेन, तर पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवणे गरजेचे होते. कारण देशाला मोदींपासून वाचवण्याची ही खरी वेळ आहे असा आरोप त्यांनी केला होता.

नवजोत कौर यांच्यासह पवन बन्सल आणि मनीष तिवारी यांची नावे उमेदवार म्हणून चंदीगड लोकसभा मतदार संघातून चर्चेत होती. अखेर, काँग्रेसकडून पवन बन्सल यांची चंदीगड मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. नवजोत कौर या अनेक महिन्यांपासून चंदीगड मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेत होत्या. काँग्रेसकडून चंदीगड या मतदार संघातून आपल्याला उमेदवारी देण्यात येईल, अशी त्यांना आशा होती. पण नवज्योत सिंह सिद्धू यांनी पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या वक्तव्यावर पक्ष नाराज असल्यामुळेच नवजोत कौर यांना उमेदवारी देण्यात आली नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. नवजोत कौर तेव्हापासून या पक्षावर नाराज असल्यामुळे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि आशा कुमारी यांच्यावर त्यांनी हा आरोप केल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment