
मुंबई : लोकसभा निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात पोहचली असून दोन निवडणूक महिला अधिकाऱ्यांची जोरदार चर्चा नेत्यांच्या घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोप यांच्या चर्चां दरम्यान झाली. आपल्या निवडणूक ड्यूटीनंतर पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या रीना द्विवेदी चांगल्याच प्रकाशझोतात आल्या.
ती निवडणूक अधिकारी म्हणते ‘विच्छा माझी पुरी करा’
‘बिग बॉस’च्या पुढील भागात भाग घेण्याची इच्छा सार्वजनीक बांधकाम खात्यात कार्यरत असलेल्या रीना द्विवेदी यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की माझ्या पाठीशी माझे संपूर्ण कुटुंब कायम खंबीर पणे उभे राहिले आहे आणि ते मला मिळतं असलेल्या प्रसिद्धीमुळे खूपच खूश आहेत. टीव्ही क्षेत्रात काम करण्याची संधी जर मिळाली तर ‘बिग बॉस’मध्ये काम करायला आवडेल. या महिलेचा फोटो एका स्थानिक वृत्तपत्राने प्रकाशित केला होता. ही महिला ज्यात ईव्हीएम घेऊन जाताना दिसली होती. या महिलेला लखनऊच्या शहरातील नगराम भागातील १७३ नंबरच्या मतदान केंद्रावर निवडणूक ड्यूटी लावण्यात आली होती.
