फेसबुक देते आपल्या इंटर्न्सला सर्वाधिक पगार


नवी दिल्ली : इंटर्नशिपसाठी दिल्या जाणाऱ्या वेतनावर अमेरिकेत एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात फेसबुक सर्वाधिक वेतन देणारी कंपनी असल्याचे समोर आले आहे. आपल्याकडील इंटर्नला फेसबुक दरमहा महिन्याला 8,000 अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय चलनात तब्बल 5.6 लाख रुपये देते.

या सर्वेक्षणानुसार फेसबुकमध्ये सध्याच्या घडीला जवळपास 2,800 नोकऱ्या आहेत. अॅमेझॉनचा यानंतर क्रमांक लागतो. आपल्याकडील इंटर्नला अॅमेझॉन दरमहा 7,725 अमेरिकन डॉलर पगार देते. या व्यतिरिक्त पहिल्या 10 कंपन्यांमध्ये सेल्सफोर्स, गुगल, मायक्रोसॉफ्ट, उबेर, ब्लुमबर्ग एल. पी., कॅपिटल वन अॅपल आणि बँक ऑफ अमेरिका यांचा क्रमांक लागतो.

तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमाण सर्वाधिक मासिक वेतन देणाऱ्या कंपन्यांमध्ये जास्त आहे. सर्वेक्षणातील या कंपन्यांचे प्रमाण जवळपास 44 टक्के आहे. तंत्रज्ञानानंतर फायनान्स आणि कन्सल्टींग कंपन्यांचा क्रमांक येतो. सर्वोत्तम क्षमता असलेल्या उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी फायनान्स कंपन्या देखील अधिक वेतन देताना दिसत आहेत.

फेसबुक आणि अॅमेझॉननंतर सेल्सफोर्स आपल्या इंटर्नला प्रतिमहिना 7,667 अमेरिकन डॉलर, इतर 5 कंपन्या 7,000 अमेरिकन डॉलर देतात. जर हा पगार पूर्ण वेळेसाठी दिला तर पगाराचा आकडा 84,000 अमेरिकन डॉलर प्रतिवर्ष होईल. हा आकडा अमेरिकेच्या सरासरी पगारापेक्षाही अधिक आहे.

Leave a Comment