सोशल मीडियात व्हायरल होत आहे एका वर्षाच्या ‘जलपरी’चा व्हिडीओ


आपल्याकडे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण प्रचलित असून याच म्हणीचा प्रत्यय सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहे. कारण अवघ्या एका वर्षांची ही चिमुरडी पाण्यात चक्क पोहताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. एक चिमुरडी या व्हिडिओत पोहताना दिसत आहे. त्याचबरोबर ही चिमुरडी पाण्यात बॅक-स्ट्रोक, फ्रंट क्रॉल आणि स्पिन करूनही आनंद घेत आहे.

लहान मूले ज्या वयात रांगणे आणि उभे राहणे शिकत असतात या चिमुरडीने त्या वयात चक्क पाण्याशी मैत्री केली आणि स्विमिंग पूलमध्ये ती बिनधास्त वावरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिडाचा हा व्हिडिओ असून या चिमुरडीच्या पालकांनी अगदी लहान वयातच तिला पोहणे शिकवण्याची सुरूवात केली. तिच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, त्यांची चिमुरडी वयाच्या अवघ्या नवव्या महिन्यातच पाण्यात पोहणे शिकल्यानंतर ती आता पट्टीची जलतरणपटू बनली आहे.

Leave a Comment