27 मे पासून सुरू होणार ‘कोण होणार मराठी करोडपती’


‘कोण होणार करोडपती’ या मराठी रिअ‍ॅलिटी शोच्या सूत्रसंचालकाच्या हॉट सीटवर सचिन खेडेकर, स्वप्निल जोशीनंतर आता ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे बसणार असल्यामुळे या शो बद्दल महाराष्ट्रातील त्याच्या तमाम चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर ‘कोण होणार करोडपती’ हा रिअ‍ॅलिटी शो सोनी मराठी चॅनलवर येत्या 27 मे पासून सुरू होणार आहे.


कोण होणार करोडपती हा बहुप्रतिक्षित रिअ‍ॅलिटी शो सोनी मराठी चॅनलवर सोमवार ते गुरूवार रात्री 8.30 वाजता पहायला मिळणार आहे. अनेक विक्रम हिंदीमध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ने रचले. बिग बी अमिताभ बच्चन हिंदीमध्ये या शोचे सूत्रसंचालन करतात. हिंदीमधील कौन बनेगा करोडपती देखील लवकरच सुरू होणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांनी नुकतेच ‘झुंड’ या चित्रपटाचं शुटींग संपवले आहे. नागराजच्या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

Leave a Comment