पेटीएम पाठोपाठ ओलाने देखील लॉन्च केले क्रेडिट कार्ड


नुकतेच पेटीएमने सिटी बँकेशी करार करत क्रेडिट कार्ड लाँच केले होते त्यापाठोपाठ आता देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियासोबत मोबाईल अॅप बेस टॅक्सी सेवा देणारी कंपनी ओलाने मिळून एक ओला मनी एसबीआई क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. सध्यातरी कोणतेही शुल्क व्हिसा पॉवर्ड प्रकारातील या कार्डवर आकारले जाणार नाही. ओला युजर्ससाठी या कार्डच्या माध्यमातून पेमेंट करने अधिक सोपे होणार आहे.

2022 पर्यंत 1 कोटी ओला मनी एसबीआय क्रेडीट कार्ड वितरित करण्याचे उद्दीष्ट ओलाने ठेवले आहे. सन 2015 मध्ये ओला मनी ओलाने लॉन्च केले होते. या कार्डसाठी ओला ग्राहक ओला अॅपच्या माध्यमातून अप्लाय करु शकतात. या अॅपच्या माध्यमातूनच क्रेडिट कार्डही मॅनेज करता येऊ शकते. ग्राहकांना यावर कॅशबॅक आणि रिवर्डही मिळणार आहे. ओला मनीमध्ये हे कॅशबॅक क्रेडिट होतील. ओला राईड्स, फ्लाईट आणि हॉटेल बुकिंग करताना ज्याचा वापर ग्राहकाला होऊ शकतो.

याबाबत माहिती देताना ओलाचे सीईओ आणि को-फाऊंडर भाविष अग्रवाल यांनी सांगितले की, एसबीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ओला मनी देश डिजिटल इकनॉमीत पुढचे पाऊल टाकेल. त्यांनी असेही सांगितले की, या वेळी ओलाच्या प्लॅटफॉर्मवरवर 15 कोटींहून अधिक लोक जोडले गेले आहेत. हे युजर्स आता कार्डच्या माध्यमातून पेमेंट सेवेचा लाभ घेतील. एसबीआय कार्डचे एमडी हरदयाल प्रसाद यांनी सांगितले की, या सेवेचा ग्राहकांना फायदा होईल.

Leave a Comment