दीपिकाच्या पासपोर्ट कव्हरची किंमत ऐकून सामान्य माणूस नक्कीच होईल थक्क


बी टाऊनच्या अभिनेत्री संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या ‘कान्स चित्रपट महोत्सवा’साठी सज्ज झाल्या असून ‘कान्स’साठी बॉलीवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पादुकोण सुद्धा रवाना झाली आहे. ‘कान्स’मध्ये दीपिकाला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर बोर्डिंग पासचा फोटो दीपिकाने शेअर केला असून त्यामुळे दीपिका लंडनहून ‘कान्स’साठी रवाना झाली असे स्पष्ट होत आहे.


अजून एक खास गोष्ट दीपिकाने शेअर केलेल्या फोटोमधून समोर आली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये दीपिकाचे पासपोर्ट कव्हर ठळकपणे दिसत आहे. हे कव्हर ‘गोयार्ड क्रिएशन’चे असून हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे. सर्वसामान्य माणूस या निळ्या रंगाच्या कव्हरची किंमत ऐकून नक्कीच थक्क होईल. ७५५ डॉलर म्हणजेच ५२,९३६ रुपये दीपिकाच्या या पासपोर्ट कव्हरची किंमत आहे.

त्याचबरोबर आता ‘कान्स’मध्ये दीपिका काय कपडे घालणार करणार आहे याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचे लक्ष लागून राहिले आहे. हे ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे ७२वे वर्ष असून १४ मे रोजी हा महोत्सव सुरू झाला असून २५ मे रोजी याची सांगता होणार आहे. या महोत्सवात देशभरातील प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत.

Leave a Comment