बेगानी शादी में 5000 अनोळखी दिवाने – कपिल शर्मा


मागील बॉलीवूडमधील अनेक जोडपी विवाहबद्ध झाल्यानंतर विनोदवीर अभिनेता कपिल शर्मा देखील विवाहबद्ध झाला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याने त्याची गर्लफ्रेंड गिन्नीसह लगीनगाठ बांधली. ‘कपिल शर्मा शो’मध्ये त्याने त्याच्या लग्नातील काही आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्या लग्नातील असे काही किस्से कपिलने शेअर केले आहेत की ते ऐकून चाहत्यांना हसू आवरत नाही.

नुकतीच भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांना पाहुणे म्हणून ‘कपिल शर्मा शो’मध्ये बोलवण्यात आले होते. या दोघांनी कपिलच्या विनोदाचा मनमुराद आनंद लुटत त्यांच्या करिअर आणि खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या. कपिलने देखील त्यात त्याच्या लग्नातील किस्से सांगितले आहेत.

जवळपास ५००० लोकांनी माझ्या लग्नाला हजेरी लावली होती. पण मी जेव्हा आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यातील मोजून ४० ते ५० लोकांना मी ओळखत असल्याचे, कपिल शर्मा म्हणाला. कपिलचे हे वक्तव्य ऐकताच चाहत्यांमध्ये हास्याची लाट पसरली होती. पुढे कपिल म्हणाला की, तुम्हाला माहित आहे का? सायना आणि कश्यप यांच्या लग्नात मोजून ४० पाहुणे हजर होते. विराट-अनुष्काच्या लग्नातही ४० लोकांना आमंत्रण देण्यात आले होते. तसेच दीपिका आणि रणवीरच्या लग्नात देखील फक्त ४० पाहुणे उपस्थित होते. हिच ती ४० लोक या तिन्ही लग्नाला उपस्थित होती का असा मोठा प्रश्न मला पडला आहे. प्रेक्षकांमध्ये त्याच्या या वक्तव्यानंतर हास्याची लाटच पसरली.

Leave a Comment