न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, मराठमोळ्या सनी पवारने पटकावला सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार


१९ व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार मुंबईच्या कलिनाजवळील कुची कर्वेनगर या झोपडपट्टी भागात राहाणाऱ्या ११ वर्षीय सनी पवारने पटकवला आहे.

त्याला हा पुरस्कार ‘चिप्पा’ या चित्रपटातील अभिनयासाठी मिळाला आहे. ‘चिप्पा’शिवाय २०१६ मध्ये आलेल्या ‘लायन’ चित्रपटातही सनीने भूमिका साकारली आहे. ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक गार्थ डेविस यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सनी ‘चिप्पा’साठी मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बोलताना म्हणाला, मला हा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. केवळ माझ्या पालकांमुळे हे सगळे शक्य झाले आहे. माझा माझ्या कुटुंबीयांना अभिमान वाटावा यासाठी रजनीकांत यांच्यासारखेच मला मोठा अभिनेता बनायचे आहे. हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये मला काम करायचे असल्याचे त्याने यावेळी म्हटले.

Leave a Comment