निवडणूक आयोगाचे ट्विटरला एक्झिट पोलबाबतचे ट्विट काढून टाकण्याचे आदेश


नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने मायक्रो ब्लॉगिंगसाईट ट्विटरला लोकसभा निवडणूकीच्या अनुशंगाने एक्झिट पोल संबंधित ट्विट काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूकीचा शेवटचा टप्पा १९ मे रोजी पार पडणार असून याच दिवशी एक्झिट पोल जाहिर करण्यात येणार आहे.

निवडणूक अंदाज सोशल मीडियातून समोर आणणाऱ्यांवर निवडणूक आयोगाचे लक्ष असणार आहे. निवडणूक आयोगाने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरलाही एक्झिट पोल हटवण्याचे आदेश दिले. यासंदर्भातील निर्देश निवडणूक आयोगाने कसे दिले याची अधिकृत माहिती समोर आली नाही. पण ट्विटरला एक एक्झिट पोल संदर्भातील ट्विट हटवण्यास निवडणूक आयोगाने सांगितले.

याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार आल्यानंतर ट्विटरला याप्रकारचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित यूजरने नंतर हे ट्विट हटवल्याचेही समोर आले आहे. असे कोणते आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याच्या एक दिवस आधीच निवडणूक आयोगाने निकालांचे अंदाज दाखवणाऱ्या 3 माध्यम संस्थांना कारणे दाखवा नोटीस जारी केले होते.

Leave a Comment