‘शिद्दत’मध्ये झळकणार हे चार कलाकार


दिनेश विजन यांच्या लुका छुपी चित्रपटाला मिळालेल्या अभूतपुर्व यशानंतर आणखी एका चित्रपटाची लवकरच निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाविषयीची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली असून या चित्रपटाचे ‘शिद्दत’ असे शीर्षक असणार आहे.

चित्रपटाची स्टारकास्टही शीर्षकासोबतच जाहीर करण्यात आली आहे. विकी कौशलचा भाऊ सनी कौशल, राधिका मदन, डायना पेंटी आणि मोहित रैना या कलाकारांच्या मुख्य भूमिका यात असणार आहेत. यात सनीच्या अपोझिट राधिका तर मोहितच्या अपोझिट डायना झळकणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल देशमुख करणार आहेत, ज्यांनी ‘जन्नत’ आणि ‘तुम मिले’सारख्या चित्रपटांचे याआधी दिग्दर्शन केले आहे. पंजाब, लंडन आणि पॅरिसमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण होणार असल्याचे म्हटले जात आहे. तर २०२० च्या उन्हाळ्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही वृत्त आहे.

Leave a Comment