हुकुमशहा सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेत ममता बॅनर्जी : विवेक ओबेरॉय


मुंबई – पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटनेनंतर लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात मतदान होण्याच्या आधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कोलकात्यात भाजप अध्यक्ष अमित शहांच्या रोडशो दरम्यान प्रचंड हाणामारीचा घटनेचा राजकीय पडसाद दिवसभर पहायला मिळाला. याविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. पण कोणत्यातरी कलाकाराने याविषयी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. हुकुमशहा सद्दाम हुसैनप्रमाणे ममता बॅनर्जी वागत असल्याची टीका विवेक ओबेरॉय याने, कोलकात्यात काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे.

ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या विवेक ऑबेरॉयने निशाणा साधला आहे. दीदींसारखे आदरणीय व्यक्तिमत्त्व सद्दाम हुसैनप्रमाणे का वागत आहे, हे मला कळत नाही. खरे तर लोकशाही खतरे में है अशी मागणी करणाऱ्या ममता दीदींमुळेच लोकशाही धोक्यात आली आहे. दीदींची ही दीदीगिरी चालणार नाही अशी टीका विवेक ओबेरॉयने केली.

Leave a Comment