देवेन भारती यांची एटीएस प्रमुखपदी नियुक्ती


मुंबई – राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर राज्यातील 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या 7 वर्षाहून अधिक काळ मुंबई पोलीस खात्यातील आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्याकडे एटीएस प्रमुख पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

त्याचबरोबर पुण्यातील गुन्हे अन्वेषन विभागात राज्याच्या एटीएस पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहणारे अतुलचंद्र कुलकर्णी यांची बदली करण्यात आली आहे. सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना पदोन्नती देत लाचलुचपत विभागात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून पाठवण्यात आले आहे. गुन्हे अन्वेषन विभाग पुणे येथून संजीव सिंघल यांना अप्पर पोलीस महासंचालक, प्रशासन मुंबई येथे पाठवण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे डॉ प्रज्ञा सरवदे यांना महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ येथे अपर पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सुनील रामानंद अपर पोलीस महासंचालक यांची सुधार सेवा पुणे येथे बदली करण्यात आली आहे. विनीत अग्रवाल – अपर पोलीस महासंचालक यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई येथे नेमणूक करण्यात आली आहे. अनुप कुमार सिंह अपर पोलीस महासंचालक यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी येथे नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर डॉ सुखविंदर सिंग अपर पोलीस महासंचालक यांची फोर्स वन मुंबई येथे तसेच प्रताप दिघावकर विशेष पोलीस महानिरीक्षक यांची महिला अत्याचार प्रतिबंध विभागात नेमणूक करण्यात आली आहे.

Leave a Comment