या स्मार्टफोनमधून येत्या वर्षात गायब होणार ‘व्हॉटसअॅप’


मुंबई : सध्या तरुणाईमध्ये इन्स्टंट मॅसेजिंग अॅप असलेले ‘व्हॉटसअॅप’ भलतेच लोकप्रिय आहे. दिवसेंदिवस या अॅप्लिकेशनचे वापरकर्त्यांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच आपण काही मोबाईलवरून व्हॉटसअॅप सुविधा हटवणार असल्याचे ‘व्हॉटसअॅप’ने जाहीर केले आहे. काही मोबाईलवर येत्या ३१ डिसेंबर २०१९ नंतर व्हॉटसअॅप वापरता येणे बंद होणार आहे. व्हॉटसअॅपच्या माहितीनुसार, अनेक जुन्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट येत्या वर्षात हटवण्यात येणार असल्यामुळे अँन्ड्रॉईड, आयओएस आणि विंडोजचे जुने ऑपरेटिंग सिस्टम असलेले फोन तुम्ही वापरत असाल तर लवकरच हे फोन बदलावे लागणार आहेत.

विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉटसअॅप ३१ डिसेंबर २०१९ नंतर बंद करण्यात येणार आहे. याशिवाय अँन्ड्रॉईड व्हर्जन २.३.७ (जिंजरब्रेड) किंवा त्याहून जुन्या व्हर्जनवर व्हॉटसअॅप बंद होईल. १ फेब्रुवारी २०२० रोजी आयफोनच्या आयओएएस ७ व्हर्जनवरही व्हॉटसअॅप काम करणं बंद करणार आहे. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर २०१७ नंतर ब्लॅकबेरी OS, ब्लॅकबेरी १०, विंडोज फोन 8.0, नोकिया एस ४०, नोकिया सिम्बियन एस ६०, आयफोन आयओएस ६, आयफोन ३GS आणि इतर जुन्या प्लॅटफॉर्मसाठी व्हॉटसअॅप बंद करण्यात आले आहे.

Leave a Comment