असे करणारी प्रियंका चोप्रा ठरली पहिली भारतीय सेलिब्रिटी


बॉलिवूड आणि हॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणारी देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा आता एका नव्या विक्रमामुळे चर्चेत आहे. नुकतेच इंस्टाग्रामवर प्रियंकाचे 40 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. ती एवढे फॉलोअर्स असणारे पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे. फक्त भारतातीलच नाही तर, संपूर्ण जगात सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या 50 लोकांमधील आशियातील प्रियंका ही एकमेव व्यक्ती ठरली आहे.

एक फोटोसह पोस्ट टाकून याबाबतची प्रियंकाने माहिती दिली आहे, 40 M असा आकडा त्यावर फक्त लिहीला आहे. तिच्या चाहत्यांचे आभार मानायलाही या पोस्टसोबत प्रियंका विसरली नाही. हॉलिवूड एन्ट्रीनंतर प्रियंकाच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली. तसेच आपली पर्सनल, प्रोफेशनल लाईफ, विविध लुक्स, कपडे, फॅशन अशा विविधांगी गोष्टींचे फोटोज ती इंस्टावर पोस्ट करत असते अशा गोष्टीही चाहत्यांना आकर्षित करतात.

दरम्यान, प्रियंकावर याबाबत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा आकडा असाच वाढत राहो, अनेक चाहत्यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे. नुकतेच मेट गालामधील लुकमुळे प्रियंका चर्चेत होती. तिच्या या लुकची अनेकांनी खिल्ली उडवली मात्र तिच्या चाहत्यांना तिचा हा लुक आवडला. काहीही असो, सध्या तिचे फॉलोअर्स पाहता चांगल्या पद्धतीने असो वा वाईट पद्धतीने असो प्रियंका किती लोकप्रिय आहे याचा अंदाज येतो.

Leave a Comment