स्वप्नील जोशीच्या ‘मोगरा फुलला’चे नवे पोस्टर रिलीज


स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. स्वप्नीलसोबतच आनंद इंगळे यांचीही झलक या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात आनंद इंगळे धायगुडे ही व्यक्तीरेखा साकारणार आहे.

कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता पडता लग्नाचे वय सरून गेलेल्या एका तरुणाची गोष्ट श्रावणी देवधर यांच्या या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. एका वेगळ्या पार्श्वभूमीची मुलगी त्याच्या आयुष्यात येते आणि त्याचे आयुष्य कसे बदलून जाते, हे चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अर्जून सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांनी केली आहे.


स्वप्नील जोशी आणि संदिप पाठक यांच्यासोबतच चित्रपटामध्ये चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

Leave a Comment