‘या’ चित्रपटात करणार स्क्रीन शेअर दीप-वीर


अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र झळकल्यानंतर आता पुन्हा लवकरच एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यास सज्ज झाले आहेत. दीप-वीर कबीर खान दिग्दर्शित ’83’ या चित्रपटामध्ये एकत्र येणार आहेत. या चित्रपटात ते ऑनस्क्रीन पती-पत्नीच्या रुपात झळकणार आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका ’83’ मध्ये कपिल देव यांच्या पत्नीची रोमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे. रणवीर सिंह या चित्रपटामध्ये 1983 विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी दीपिकाला काही दिवसांपूर्वी विचारणा करण्यात आली होती. दीपिकानेदेखील त्यानंतर या चित्रपटासाठी तिचा होकार कळविला आहे. दीप-वीरने आतापर्यंत तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून त्यांचा हा चौथा चित्रपट आहे.

25 जून 1983 रोजी भारतीय संघाने लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. ’83’ हा चित्रपट याच विजयगाथेवर आधारित आहे. दिग्दर्शक कबीर खान ‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंह, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

Leave a Comment