सुप्रिया सुळेंसंदर्भात आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बदडले


मुंबई – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात फेसबुकवर कोल्हापुरातील एका तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केली होती. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यानंतर त्याला घरी जाऊन बदडल्याची घटना घडली आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला बदडल्यानंतर माफी मागण्यास सांगितले. माफी मागितल्यानंतर तरूणाला उठाबशा काढून फेसबूक अकाउंट डिलीट करण्यास भाग पाडले. तसेच त्याचा मोबाईल काढून घ्या, अशी समज त्याच्या घरच्यांना देण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत फेसबूक पेजवर याबाबतचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

Leave a Comment