हल्दीराम रेस्टॉरंटच्या खाद्य पदार्थात मेलेल्या पालीचे पिल्लू


नागपूर – मेलेल्या पालीचे पिल्लू शहरातील अजनी चौकातील प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंटच्या खाद्य पदार्थात आढळल्याची घटना घडली असून यश अग्निहोत्री या व्यक्तीने याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

हल्दीराम रेस्टॉरंटमधून सांबरची ऑर्डर वर्धा येथील यश अग्निहोत्री यांनी केली होती. त्यांना या सांबरमध्ये पालीचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. याची तक्रार त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली असून अन्न व औषध प्रशासनाने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तक्रारकर्ते अग्निहोत्री कुटुंबातील २ जणांना या घटनेनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

Leave a Comment