‘दे दे प्यार दे’मधील इमोशनल गाणे रिलीज


गुरुवारी म्हणेज एक दिवस आधीच अजय देवगण, तब्बू आणि रकुल प्रीत सिंह यांच्या भूमिका असलेला ‘दे दे प्यार दे’ चित्रपट रिलीज होणार आहे. त्यातच चित्रपटातील अनेक गाणी रिलीज केली जात आहेत. आतापर्यंतच्या गाण्यांना प्रेक्षकांकजून मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर नुकतेच चित्रपटातील एक नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

या गाण्याचे ‘दिल रोयी जाये’ असे शीर्षक आहे. अजय आणि रकुलवर हे एक इमोशनल गाणे असून चित्रीत केले गेले आहे. या गाण्यात नात्यात आलेल्या दुराव्यामुळे दोघांच्या मनाची चाललेली घालमेल पाहायला मिळते. ‘तेरा यार हूँ मैं’ गाण्याच्या टीमने या गाण्याला आवाज दिला आहे.

या गाण्याला अधिक खास अरिजीत सिंग, रोचक कोहली आणि कुमार यांच्या आवाजाने बनवले आहे. आता हे गाणे प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी ठरते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान लवकरच अजय या चित्रपटाशिवाय ‘भूज: द प्राईड ऑफ इंडिया’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबतच या चित्रपटात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

Leave a Comment