‘इंडियाज मोस्ट वान्टेड’मधील देशभक्तीपर गाणे रिलीज


‘वंदे मातरम’ गाण्याचे देशभक्तीवर आधारित गाण्यांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. देशप्रेम तर या गाण्यातून व्यक्त होतेच, त्याचबरोबर देशाप्रती असलेला आदरही व्यक्त होतो. हेच गाणे आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे अभिनेता अर्जुन कपूरच्या ‘इंडियाज मोस्ट वान्टेड’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

अमित त्रिवेदी यांनी ‘वंदे मातरम’ या गाण्याला संगीत दिले आहे तर पॅपोन, अल्तमश फरीदी यांनी हे गाणे गायले आहे. कोरसमध्ये राजीव सुंदरेसन, अर्जुन कामत आणि सुहास सावंत यांनी आवाज दिला आहे. तर, या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत.

राज कुमार गुप्ता यांनी ‘इंडियाज मोस्ट वान्टेड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात दहशतवाद्याला पकडण्यासाठी पाच जण कशाप्रकारे प्रयत्न करतात, हे दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट २४ मे रोजी रिलीज होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित पी.एम.मोदी आणि इशा गुप्ताचा ‘वन डे’ हे चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या तिन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर शर्यत पाहायला मिळेल.

Leave a Comment