नीता अंबानींच्या पर्समध्ये आहे तरी कोणता मंत्र, फॅन्सनी विचारला प्रश्न


मुंबईने आयपीएलच्या १२ व्या मोसमात चेन्नईचा १ धावेने पराभव करत आयपीएलकिंग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. मुंबई इंडियन्सने सांघिक कामगिरीच्या जोरावर चौथ्यांदा विजेतेपद पटकाविले. मुंबईच्या विजयाच्या वाटेत जितका खेळाडूंचा वाटा, तितकाचा संघाच्या मालकिण नीता अंबानी यांचाही वाटा आहे.

प्रत्येक सामन्यात स्टेडियममध्ये नीता अंबानी या उपस्थित राहून खेळाडूंना चिअरअप तर करतातच शिवाय त्या भर सामन्यात विजयासाठी मंत्र म्हणत असल्याचे दिसून येते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मुंबईच्या विजयासाठी नीता अंबानी कोणता मंत्र म्हणतात याची विचारणा फॅन्सकडून होत आहे. जेव्हा मुंबईचा संघ अडचणीत असतो तेव्हा पर्समध्ये बघून त्या मंत्र म्हणत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबईने अंतिम सामन्यात ८ बाद १४९ धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात चेन्नईला २० षटकांत ७ बाद १४८ धावाच करता आल्या. शेवटच्या चेंडूत चेन्नईला विजयासाठी २ धावांची गरज होती. मात्र, मलिंगाने ठाकूरला पायचीत करून चेन्नईच्या विजयाचा घास हिरावून घेतला.

Leave a Comment