सीएटच्या क्रिकेट रेटिंगमध्ये कोहली सर्वोत्कृष्ट फलंदाज, तर बुमराह सर्वश्रेष्ठ गोलंदाज


मुंबई – सीएट क्रिकेट रेटिंगकडून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला २०१९ वर्षातील सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि फलंदाज म्हणून तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सर्वश्रेष्ठ गोलंदाज म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर वर्षातला सर्वश्रेष्ठ एकदिवसीय खेळाडूचा किताब नुकतेच मुंबई इंडियन्सला आयपीएलचा किताब मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला देण्यात आला.

सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच याला निवडण्यात आले आहे. टी-२० मधील सर्वोत्कृष्ठ गोलंदाज म्हणून अफगाणिस्तानचा राशिद खान तर पुजारा याला वर्षातील सर्वश्रेष्ठ कसोटी खेळाडू म्हणून निवडण्यात आले. भारताच्या स्मृति मंधानाची सीसीआरने महिला क्रिकेटपटूंमध्ये वर्षातील सर्वश्रेष्ठ महिला खेळाडू म्हणून निवड केली आहे. भारताच्या पहिल्या विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य मोहिंदर अमरनाथ लाइफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला. तर यशस्वी जयस्वाल याला सर्वश्रेष्ठ ज्युनियर क्रिकेटर म्हणून निवडण्यात आले आहे.

Leave a Comment