उद्यापासून फ्लिपकार्टचा ‘बिग शॉपिंग डेज’ सेल


‘बिग शॉपिंग डेज’ या ऑनलाइन सेलची घोषणा ‘फ्लिपकार्ट’ या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटने केली आहे. हा सेल 15 मे म्हणजेच उद्यापासून सुरु होणार आहे. अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर 4 दिवस चालणाऱ्या या ऑनलाइन सेलमध्ये आकर्षक सुट देण्यात येणार आहे.

अॅपल, सॅमसंग, शाओमी, विवो, ओपो या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सच्या किंमतींवर 15 ते 19 मे दरम्यान चालणाऱ्या या ऑनलाइन सेलमध्ये सुट देण्यात येणार आहे. तसेच एचडीएफसी बॅंकेचे क्रेडीट किंवा डेबिट कार्ड वापरुन पेमेंट केल्यास आणखी 10 टक्के सुट मिळणार आहे.

या सेलदरम्यान कोणत्या मोबाईल फोनवर किती सुट देण्यात येणार आहे त्याची माहिती देखील फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोबाईल फोन सोबतच इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे, फर्निचर यांच्या किंमतीवर देखील आकर्षक सुट फ्लिपकार्ट कडून देण्यात येणार आहे.

अॅमेझॉन या वेबसाईटवर देखील काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे ऑनलाइन सेल दरम्यान मोबाईल फोन आणि इतर प्रॉडक्टसवर सुट देण्यात आली होती. अनेक कंपन्यांचे नवे स्मार्टफोन या महिन्यात बाजारात येत असल्यामुळे त्या कंपन्यांच्या सध्या बाजारत असलेल्या फोन्सवर सेलदरम्यान भरघोस सुट देण्यात येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.

Leave a Comment