8 हजार मृतदेह आणि 1252 पुरातन ममीचे सिलसिली बेटावरील संग्रहालयात प्रदर्शन


पालेर्मो – इटलीमधील स्वायत्त बेटावरील ‘सिलसिलीच्या पालेर्मो कॅपुचिन’ संग्रहायलात ठेवलेल्या 8 हजार मृतदेहासोबत आता 1252 पेक्षा अधिक ममीचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. मृतदेहाचे शहर असे देखील या शहराला म्हटले जाते. ईसाई भिक्षूंनी 16 व्या शतकात मृतदेह दफन करण्याचे आणि ममी ठेवण्याचे काम सुरू केले होते. या प्रदर्शनामुळे आता सामान्य नागरिकसुद्धा हे मृतदेह आणि ममी पाहू शकतील.

या ठिकाणी यापुर्वी एक स्मशानभूमी होती, येथे नंतर संग्रहालय बांधण्यात आले आणि ममीच्या रूपात मृतदेह सुरक्षित ठेवण्यात आले. पण या ठिकाणी 1920 नंतर मृतदेह ठेवण्याचे काम बंद करून याला संग्रहालयात बदलण्यात आले. विशेष बाब म्हणजे या विचित्र संग्रहालयाला फक्त भिक्षु लोक चालवतात. येथे आपण ममी कबर आणि ताबूतमध्ये वेगवेगळ्या अवस्थेत पाहू शकता. यातील काही ममी पुर्णपणे सुरक्षित असून काही मोडकळीस आल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ममी बनवण्याची प्रक्रिया अवघड असून 70 दिवस यासाठी लागत होते. धर्मगुरूंसोबत तज्ञांची यासाठी एक टीम बनवली जायची, जेणेकरून हे काम पुर्ण होईल. ममी हा शब्द प्राचीन इजिप्तचा नसून तो अरबी भाषेतील मुमियापासून तयार झाला आहे, मेणाचा लेप लावलेली एखादी वस्तू असा ज्याचा अर्थ होतो. पण विशेष बाब म्हणजे इजिप्तध्ये ममी बनवण्याचे काम खूप श्रद्धेने केले जाते.

Leave a Comment