शाहरुख खानसोबत काम केलेल्या या सहा अभिनेत्रींचे झाले निधन


१९९२ मध्ये ‘दीवाना’ चित्रपटातून अभिनेता शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर तो बॉलिवूडचा बादशहा झाला. सध्याच्या घडीला प्रत्येक अभिनेत्रीला शाहरुख खानसोबत एखाद्या तरी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे.या सगळ्यात सहा अभिनेत्री अशा आहेत, शाहरुखसोबत ज्यांनी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. पण त्या आज या जगात नाहीत. त्याच सहा अभिनेत्रींबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शाहरुखसोबत अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रत्येकाचं मन जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांनी काम केले. शाहरुखसोबत रिमा यांनी ‘कुछ कुछ होता है’, ‘येस बॉस’ आणि ‘कल हो ना हो’ या चित्रपटात काम केले आहे. २०१७ मध्ये रिमा लागू यांचे निधन झाले.

‘दिवाना’ या शाहरुखच्या पहिल्याच चित्रपटात त्याची दिव्या भारती हिरोइन होती. त्याकाळी दिव्या ही आघाडीची अभिनेत्री होती. पण तिचा वयाच्या २२ व्या वर्षी मृत्यू झाला. आजही अनेकांसाठी दिव्याचा मृत्यू हा न उलगडलेले कोडे आहे.

शाहरुखसोबत ‘बिल्लू बार्बर’ आणि ‘स्वदेस’ या चित्रपटांत रसिका जोशी यांनी काम केले होते. आजही तिला मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्यांचे ७ जुलै २०११ मध्ये निधन झाले.

‘कभी खुशी कभी गम’, ‘दिल से’, ‘कल हो ना हो’ अशा चित्रपटांमध्ये शाहरुख खानच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जोहरा सेहगल याही आता या जगात नाही. त्यांनी २०१४ मध्ये अखेरचा श्वास घेतला.

फक्त दोन चित्रपटात श्रीदेवी आणि शाहरुख यांनी काम केले. दोघांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा ‘आर्मी’ चित्रपटात काम केले होतो. शाहरुख या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता. तर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात श्रीदेवी यांची छोटेखानी भूमिका होती. दुबईतील एका हॉटेलमध्ये गेल्यावर्षी २४ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यु झाला.

शाहरुखसोबत ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुधा शिवपुरी यांनीही मेमसाब चित्रपटात काम केले आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी २०१५ मध्ये अखेरचा श्वास घेतला.

Leave a Comment