‘या’ एका अटीवर सनी लिओनने साइन केलेले सहा पॉर्न चित्रपट


आज बी टाऊनची बेबी डॉल अर्थात अभिनेत्री सनी लिओन तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या पहिल्या करिअरबद्दल सनीने अनेकदा मोकळेपणाने चर्चा केली. तिने स्वतःच्या हिंमतीवर यश आणि सन्मान कसा मिळवला जाऊ शकतो हे दाखवून दिले.

पॉर्न इंडस्ट्रीतून सनीने तिच्या करिअरची सुरुवात केली हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. पण तिचा या क्षेत्रात जाण्यापूर्वीही संघर्ष काही कमी नव्हता. तिला आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर झगडावे लागले होते. अनेक गोष्टींचा खुलासा सनीच्या ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिक वेब सीरिजमध्ये करण्यात आला आहे. पैशांसाठी ती सकाळी पेपर टाकण्याचे कामही करायची, हे या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे.

तिच्या त्या एका अटीचाही या वेबसीरिजमध्ये खुलासा करण्यात आला आहे. एकाचवेळी सहा पॉर्न चित्रपट सनीने साइन केले होते. पण यात काम करण्याची तिची एक अट होती. सहा पॉर्न चित्रपटात प्रियकर मेट एरिक्सनसोबतच सनी काम करणार अशी तिची अट होती. हे कॉन्ट्रॅक्ट सनीने २००७ मध्ये साइन केले होते. त्यानंतर ते जोपर्यंत एकत्र होते सनीने फक्त त्याच्यासोबत काम केले.

सनीने पॉर्न इण्डस्ट्रीमध्ये वयाच्या फक्त १९ व्या वर्षी पाऊल ठेवले. ती सुरुवातीला फक्त मुलींसोबत काम करायची. ती सुरुवातीच्या काळात समलैंगिक नात्यांसाठीच्या चित्रपटात काम करायची. मात्र पुढे जाऊन प्रियकर मेट एरिक्सनसोबतही तिने काम करायला सुरुवात केली.

सनी आणि मेटचे २००८ मध्ये ब्रेकअप झाले. सनीने हे नातं संपल्यानंतर पॉर्न चित्रपटात काम करणे बंद केले. मेटनंतर सनीच्या आयुष्यात कॅनेडाचा प्रसिद्ध विनोदवीर रसेल पीटर्ससोबत आला. पण या दोघांचे नातेही फार काळ टिकले नाही.

सनीच्या आयुष्यात रसेलनंतर डॅनिअल आला. तीन वर्ष सनी आणि डॅनिअलने एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०११ मध्ये लग्न केले. सनी याचवर्षी बिग बॉसमध्ये दिसली. यासाठी ती पहिल्यांदा भारतात आली आणि यानंतर ती परत कधीच कॅनडाला गेली नाही.

Leave a Comment