नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू दहशतवादी – कमल हसन


चेन्नई : अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वक्तव्य केले आहे. दक्षिण भारतात त्यांच्या या वक्तव्याने खळबळ मोठी खळबळ माजली आहे.

कमल हसन यांनी चेन्नईतील अर्वाकुरची येथील प्रचारावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण केले. ते त्यावेळी बोलताना म्हणाले की, स्वतंत्र भारतात पहिला दहशतवादी हिंदू. त्याचे नाव नथुराम गोडसे होते. येत्या रविवारी अर्वाकुरची पोटनिवडणूक होणार आहे. हमल हसन यांनी हे वक्तव्य तिथल्या प्रचारसभेत केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता दोन्ही बाजूने प्रतिक्रिया येत असून काही लोकांच्या मते हसन यांनी केलेले वक्तव्य बरोबरच आहे, तर काहींनी मात्र त्यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी यांचा नथुराम गोडसे याने खून केला आहे. त्यामुळे गोडसे याच्यावर सातत्याने स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी, असा आरोप करण्यात येतो. याआधी अनेकांनी हा आरोप केलेला आहे.

काही दिवसांपूर्वी ट्विटरवर याबाबत बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक, गीतकार आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनीही एक पोस्ट शेअर केली होती. ते यात म्हणतात, स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी कोण असा प्रश्न माझ्या एका मित्राने विचारला? माझे त्यावर गोडसे उत्तर आहे. विशाल भारद्वाज यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. भारद्वाज यांच्या या पोस्टमुळे काहींनी त्यांच्यावर टीकादेखील केली होती.

Leave a Comment