प्राइम मेंबरशिप ग्राहकांसाठी रिलायन्स जिओची गुडन्यूज


मुंबई : आपल्या प्राइम मेंबरशिप ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने एक गुडन्यूज दिली आहे. आपल्या ग्राहकांची प्राइम मेंबरशिप जिओने एका वर्षाने वाढवली असल्यामुळे जिओ अॅपचे मोफत अॅक्सेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या प्राइम मेंबरशिप असलेल्या ग्राहकांची मेंबरशिप जिओने ऑटो रिन्यू केली आहे. त्यामुळे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम जगतात एन्ट्री केल्यानंतर कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली. इतर कंपन्यांनी अनलिमिटेड डेटा, कॉलिंगसह अनेक ऑफर देण्यास सुरूवात केली. आता जिओने प्राइम मेंबरशिपची मुदत वाढविली आहे. त्यामुळे रिलायन्सचे ग्राहकांसाठी हा एक प्रकारे बोनस ठरला आहे.

तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल आणि तुमची मेंबरशिप रिन्यू झाली की नाही हे तपासायचे असेल तर तुमच्या मोबाइलमधील माय जिओ अॅपवर जा. अॅपच्या वरील डाव्या बाजूस हॅम्बर्गर मेन्यू दिसेल. तिथे माय प्लान सेक्शनमध्ये जाऊन जिओ प्राइम मेंबरशिपचा पर्याय दिसेल. तिथेच तुम्हाला याची माहिती समजेल.

९९ रुपये जिओ प्राइम मेंबरशिपची किंमत आहे. फक्त सध्या जुन्या प्राइम ग्राहकांना ऑटो रिन्यू मेंबरशिप ऑफर लागू आहे. तुम्ही नवीन ग्राहक असाल तर ९९ रुपयांचा रिचार्ज करून प्राइम मेंबरशिप घेता येईल. दरम्यान, जिओ प्राइम मेंबरशिपमुळे तुम्ही जिओ सिनेमा, जिओ म्युझिक, जिओ टीव्ही आदी अॅपचा सहज वापर करु शकता.

Leave a Comment