OMG…! 37 वर्षीय काकीसोबत 18 वर्षीय पुतण्याचा प्रेमविवाह


हिंगोली – आपल्या 37 वर्षीय काकीसोबत एका 18 वर्षीय तरुणाने प्रमेविवाह केल्याचा धक्कादायक प्रकार वसमत तालुक्यातील नाहद येथे घडला आहे. दोघांमध्ये गेल्या २ ते ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काल ग्रामस्थांच्या साक्षीने त्यांनी मंदिरात लग्न केले. ही घटना मातृत्व दिनाच्या दिवशीच घडल्याने त्याची जिल्ह्यात चर्चा होत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून तरुण आणि त्याची काकी कुटुंबासह शेतात वास्तव्यास आहेत. पुतण्याचे यातून 37 वर्षीय काकीसोबत प्रेमसूत जुळले. त्यांच्या लपून-छपून गाठी-भेटी वाढत गेल्या. त्यांचीतील प्रेम प्रकरण एवढे रंगले की, त्यांनी प्रेमविवाह करण्याचे ठरवले. त्यांनी शेवटी गावातील मंदिरात जाऊन एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालत विवाह केला.

गेल्या २-३ वर्षांपासून दोघे नात्याने काकी-पुतणे असलेल्या या जोडप्याचे प्रेम संबंध चांगलेच चर्चेत आलेले. काकीला २ अपत्येही असून नवरादेखील जीवंत असल्याची माहिती समोर आली आहे. पण या विवाहाला त्याने संमती दिलीच कशी? यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत. अचानकपणे या दोघांचा प्रेमविवाह झाल्याने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment