भाजप उमेदवार म्हणतो; नेहरुं ऐवजी जिना पंतप्रधान झाले पाहिजे होते


रतलाम – रतलाम-झाबुआ या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या गुमानसिंग दामोर या उमेदवाराने भारत स्वतंत्र होत असताना मोहम्मद जिना यांना जर पंडित नेहरु यांच्या ऐवजी पंतप्रधान बनवले असते तर देशाचे दोन तुकडे झाले नसते, असे म्हटले आहे.

उत्तम वकिल, एक विद्वान व्यक्ती अशा मोहम्मद जिनांची ओळख होती. पंतप्रधान होण्याचा हट्ट जवाहरलाल नेहरु यांनी केला नसता तर देशाचे पंतप्रधान जिना हे झाले असते. काँग्रेस या देशाचे तुकडे होण्यास जबाबदार असल्याचेही गुमानसिंग दामोर म्हणाले.

Leave a Comment