सनथ जयसूर्यावर आयसीसीची दोन वर्षांची बंदी


दुबई – माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यावर आयसीसीच्या एसीयूला (लाचलुचतपत प्रतिबंधक समिती) सहकार्य न केल्याचा ठपका ठेवत आयसीसीने दोन वेगवेगळ्या आरोपांवरून दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

त्याच्यावर ही कारवाई आयसीसीच्या कलम 2.1.3, 2.1.1 चे उल्लघंन केल्याने करण्यात आली आहे. तसेच कलम 2.4.7 एसीयूच्या तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला होता. जयसूर्यावर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्याला लाच देणे, आंतरराष्ट्रीय सामन्याचे निकाल प्रभावित करणे आणि भ्रष्टाचारविरोधी समितीच्या चौकशीत असहकार्य करण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. स्वत:विरुद्धच्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी या माजी डावखुऱ्या खेळाडूला 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Leave a Comment