आयपीएलच्या अंतिम फेरीनंतर ‘हे’ खेळाडू झाले मालामाल


चेन्नईला आयपीएलच्या 12 व्या हंगामात एका धावेने पराभूत करून चौथ्यांदा मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले. मुंबईला ट्रॉफी आणि 20 कोटी रुपयांच बक्षीस मिळाले. पराभवामुळे उपविजेतेपदावर आठव्यांदा फायनलला पोहोचलेल्या चेन्नईला समाधान मानावे लागले. 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस त्यांना मिळाले.

ऑरेंज कॅप यंदाच्या हंगामात पुनरागमन केलेल्या डेव्हिड वॉर्नरने जिंकली. 12 सामन्यात त्याने सर्वाधिक 692 धावा केल्या. यात एका शतकासह 8 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला 10 लाखांचे बक्षीस मिळाले. चेन्नईचा सर्वात जास्त वयाचा खेळाडू इम्रान ताहिरने 26 विकेट घेतल्या. पर्पल कॅपचा विजेता ठरलेल्या ताहिरलासुद्धा 10 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू शुभमन गिलची उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

यंदाच्या हंगामात सर्वात वेगवान अर्धशतक करण्याची कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला 10 लाखांचे बक्षीस मिळाले. मुंबईला शेवटच्या सामन्यात पोलार्डने आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची कामगिरी केली. त्याला कॅच ऑफ द सीजन पुरस्कार देण्यात आला. सुपर स्ट्राइकरचा पुरस्कार आय़पीएलच्या 12 व्या हंगामात 52 षटकार मारणाऱ्या रसेलला मिळाला. रसेलला हॅरियर कार मिळाली. त्याचसोबत रसेलची मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून निवड झाली.

स्टायलिश क्रिकेटपटू म्हणून किंग्ज इलेव्हन पंजाबचा क्रिकेटपटू के एल राहुलला पुरस्कार देण्यात आला. गेम चेंजर ऑफ द इयरच्या पुरस्काराने राहुल चाहरला गौरवण्यात आले.

Leave a Comment