खिशात दमडी नसली तरी देश-विदेशात फिरण्यासाठी ‘या’ बँका करत आहेत मदत


सध्याच्या घडी सुट्ट्यांचा मौसम सुरु आहे. आपल्यापैकी कित्येकजणांनी गावी किंवा बाहेरगावी कुठेतरी जाण्याचे प्लॅनिंग तर नक्कीच केले आहे. पण आपल्यापैकी अनेकजणांची अवस्था खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी असते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. पण आम्ही आज तुम्हाला एका अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. जिथून तुम्ही पैसे घेऊन आरामात फिरायला जाऊ शकता. ते पैसेनंतर तुम्ही मासिक हफ्त्याच्या रुपाने देखील भरु शकता

ट्रॅव्हल लोनची लोकप्रियता आपल्या देशात वाढत असून पर्यटनासाठी सहज कर्ज उपलब्ध होत आहे. तुम्ही ट्रॅव्हल लोनसाठी अर्ज केला तर ते सहज मिळते. डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म इंडिया लेंड्सने सादर केलेल्या अहवालानुसार भारतात तरुण सर्वात जास्त ट्रॅव्हल लोन घेतात. पर्यटनासाठी लागणाऱ्या कर्जात 55 टक्के वाढ झाली आहे. आता आम्ही तुम्हाला हे कर्ज कसे घ्याल याबद्दलची माहिती सांगणार आहोत.

ग्राहकांना पर्यटन कर्ज देताना फिरण्याचे ठिकाण ठरवण्याचे आयसीआयसीआय बँक पूर्ण स्वातंत्र्य देते. येथे 20 लाखापर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकते. शिवाय कुठलीही सिक्युरिटीची गरज या कर्जासाठी लागत नाही. यासाठीचा अर्ज आणि पुढची पद्धत खूप सोपी आहे. याचा व्याज दर 10.99 टक्के प्रति वर्ष सुरू आहे.

तुम्ही पेटीएमकडूनही ट्रॅव्हल लोन घेऊ शकता. येथे ईएमआयवर मिळणारे व्याज दर तुमच्या क्रेडिट कार्डावर अवलंबून आहे. ते 13 ते 17 टक्क्यापर्यंत असते. ग्राहक बजाज फिनसर्विस पर्सनल लोनद्वारे एकटे किंवा कुटुंबाबरोबर देशात किंवा परदेशात सुट्टीवर जाऊ शकतात. 5 मिनिटात हे कर्ज मान्य केले जाते. याशिवाय बजाज फिनसर्विस ग्राहकांना तिकीट बुकिंग आणि हाॅटेल्सचीही सोय करून देते. जास्तीत जास्त 25 लाख रुपये हे कर्ज मिळते. 12.99 टक्के त्याचा सुरुवातीचा व्याजदर आहे.

50 हजार रुपयांपासून ते 15 लाख रुपयांपर्यंत एक्सिस बँक कर्ज देते. 15.5 ते 24 टक्क्यांपर्यंत याचा व्याज दर आहे. एक्सिस बँक दोन महिन्यांचा EMI देण्याची सवलत देते. EMI तिसऱ्या महिन्यापासून सुरू होते. तुमचे पर्यटनाचे ठिकाण निवडण्याबरोबर 25 लाख रुपयापर्यंत टाटा कॅपिटल कर्ज देते. व्याज दर 11.49 ते 21 टक्के आहे. याला गॅरंटरची गरज नाही.

Leave a Comment