आता मालिकेच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार ‘सैराट’


२०१६मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट.’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आजही प्रेक्षकांच्या तोंडून या चित्रपटातील गाणी असो किंवा आर्ची- परश्याचे सुपरहिट डायलॉग्स सरास ऐकायला मिळतात. रुपेरी पडद्यावर ‘सैराट’ या चित्रपटाने अधिराज्य गाजवले होते. या चित्रपटाची आता हिंदी मालिका येणार आहे.

आता ‘सैराट’ चित्रपटावर आधिरित एक हिंदी मालिका सुरू होणार असून ‘जात ना पूछो प्रेम की’ असे या मालिकेचे नाव ठेवण्यात आले आहे. तसेच आर्ची आणि परशाच्या भूमिकेत ‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेतील अभिनेता किंशूक वैद्य आणि अभिनेत्री प्रणाली राठोड दिसणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आर्ची-परशाची ही कथा मालिकेत घडणार आहे.

अँड टीव्हीचे विष्णु शंकर यांनी ‘जात ना पूछो प्रेम की’ या मालिकेची घोषणा करत प्रत्येकापर्यंत चित्रपटात दाखवण्यात आलेली कथा पोहोचायला हवी आणि टीव्ही त्यासाठी सर्वांत उत्तम माध्यम असल्याचे म्हटले. आता ही मालिका कधी सुरू होणार यासाठी चाहते आतुर आहेत.

Leave a Comment