बडवे समाजाने केली स्वतंत्र विठ्ठलच्या नव्या मूर्तीची स्थापना


पंढरपूर – अवघ्या महाराष्ट्राचे पंढरपुरातील विठ्ठल म्हणजे दैवत असून पण आता त्याच्या मंदिरावर सत्ता कोणाची याबाबत न्यायालयात लढाई झाली. न्यायालयाने आदेश दिल्यानुसार विठ्ठल मंदिरावरचा ताबा बडवे-उत्पात समाजाला गमवावा लागला होता. त्यानंतर नाराज उत्पात समाजाने रुक्मिणीचे स्वतंत्र मंदिर उभा केले, बडवे समाजाकडून आता विठ्ठलाचेही नवे मंदिर उभे राहिले आहे. म्हणजे पंढरीत आता चक्क दोन विठ्ठल विराजमान आहेत. बाबासाहेब बडवे यांनी काल विठ्ठलाच्या नव्या मूर्तीची स्थापना केली.

बडव्यांच्या पंढरपुरातील वाढलेल्या मुजोरीमुळे त्यांचा मंदिरावरील ताबा न्यायालयाने काढून घेऊन मंदिरात पगारी पुजारी नेमले. बडवे समाजाच्या मनात कैक दिवसापासून ही चीड खदखदत होती, त्यामुळे बाबासाहेब बडवे यांनी आता पंढरपूरमध्येच काळा मारुतीजवळ नवीन विठ्ठल मंदिर उभारले आहे. यावी आपल्या समाजातील मंडळींना उपासना करता यासाठी या मंदिराची स्थापना झाली आहे. विठ्ठलाची ही नवीन साडेतीन फुट उंचीची मूर्ती पंढरपुरातील एका कारागिराने बनवली. या मूर्तीची काल स्थापना करून तिला मूळ विठ्ठलासारखा पेहराव करण्यात आला होता.

मागच्या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी उत्पात समाजाने रुक्मिणीचे नवे मंदिर उभारले होते. याच धर्तीवर आता नव्या मंदिरात विठ्ठलाची नवी मूर्ती स्थापन झाली आहे. यावेळी ‘हे आमचे खासगी मंदिर असून, याठिकाणी इतरही भाविक येऊ शकतात’, असे बडवे समाजाने लोकमत वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment