लेनोव्हाने लॉन्च केले 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे स्मार्टवॉच


भारतात एक नवीन फिटनेस स्मार्टवॉच लेनोव्हा कंपनीने नुकतेच लॉन्च केले आहे. कंपनीने या डिजीटल वॉचला लेनोव्हा Ego असे नाव दिले असून 2 हजार रुपयांचा आतमध्ये त्याची किंमत आहे.

तुम्हाला या स्मार्टवॉचच्या मदतीने हार्ट रेट, ट्रॅकिंग, स्टेट ट्रॅकिंग, स्लिप मॉनिटरिंग आणि अन्य एक्टिविटी ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहेत. पण कंपनीकडून असा दावा करण्यात आला आहे की हे एकदा चार्च केल्यास 20 दिवसापर्यंत त्याचे चार्जिंग राहू शकते. त्याचसोबत युजर्सला कॉल, मेसेज, इमेल आणि सोशल मीडियावरील विविध अॅपचे नोटिफिकेशनची सेवा मिळणार आहे. तर हे स्मार्टवॉच 50 मीटर पाण्याच्या खोलीपर्यंत जरी गेल्यास तरीही सुरु राहू शकते.

तुम्ही 1,999 रुपयांना फ्लिपकार्ट आणि क्रोम रिटेल येथून लेनोव्हा ईगो हे स्मार्टवॉच खरेदी करु शकता. या स्मार्टवॉचवर फ्लिपकार्टच्या ग्राहकांना 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे. तसेच आयओएस आणि अँन्ड्रॉईड स्मार्टफोनसाठी तुम्ही हे वॉच वापरु शकणार आहात. परंतु युजर्सला मोबाईलमध्ये लेनोव्हा लाइफ अ्रॅप डाऊनलोड करावा लागणार आहे.

Leave a Comment