38 व्या वर्षी चौथ्यांदा आई बनली किम कार्दाशिअन


आपल्या मादक अदा, सेक्सी फिगर आणि हॉट व बोल्ड फोटोज-व्हिडीओमुळे सतत चर्चेत असणारी किम कार्दाशिअन चौथ्यांदा आई बनली आहे. सरोगसीच्या माध्यमातून किम आणि तिचा नवरा केने वेस्ट यांना अपत्यप्राप्ती झाली आहे. या बाळाचा जन्म झाला शुक्रवारी, 10 मे रोजी असून, बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. किमने ट्विटद्वारे आपल्या चाह्त्यांपर्यंत पुत्रप्राप्तीचा आनंद पोहचवला. सरोगसीच्याच माध्यमातून किमच्या तिसऱ्या मुलीचा जन्मही झाला होता.

आजही आपल्या फिगरमुळे 38 वर्षीय किम भल्याभल्यांची झोप उडवते. नुकताच मेट गालामध्ये आपला जलवा दाखवून प्रकाशझोतात राहिलेली किम, या बाळाच्या जन्मामुळे आता चर्चेत आली आहे. किम आणि केने हे आधीच तीन मुलांचे, नॉर्थ (5 वर्षे), सेंट (3 वर्षे) आणि शिकागो (1 वर्षे) चे पालक आहेत. यामध्ये आता चौथ्या मुलाची भर पडली.

यासंदर्भात पेज सिक्सने दिलेल्या वृत्तानुसार शिकागोच्या वेळी ल रीना हेन्स या महिलेने त्यांची सरोगसीसाठी मदत केली होती. पण ही महिला आता स्वतःच्या मुलाला जन्म देणार असल्याने या चौथ्या अपत्यासाठी किमने दुसऱ्या एका महिलेचा शोध घेतला.

या मुलाच्या आगमनाची बातमी किमने ट्विट करत दिली, तसेच सध्या हा शिकागोसारखा दिसत आहे, पण त्याच्यामध्ये लवकरच बदल होईल असेही सांगितले. आपल्याला चार मुले असावीत असे किमला नेहमीच वाटायचे, आता तिची ही इच्छा आणि स्वप्न पूर्ण झाले आहे. मदर्स डेच्या पार्श्वभूमीवर या मुलाचा जन्म झाल्याने किमचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

Leave a Comment