तब्बल 334 कोटींचे मालक आहेत ज्योतिरादित्य सिंधिया


नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात 12 मे रोजी सात राज्यातील 59 जागांसाठी मतदान होणार आहे, 979 उमेदवारांचे भवितव्य ज्यात पणाला लागणार आहे. सहाव्या टप्प्यातील 967 उमेदवारांपैकी 311 उमेदवारांकडे एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती आहे. मध्य प्रदेशातील गुणा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया सर्वात उमेदवार आहेत, तर सर्वात गरीब उमेदवार रंगलाल कुमार हे आहेत.

एडीआरच्या रिपोर्टनुसार, 374.56 कोटींच्या संपत्तीसह ज्योतिरादित्य सिंधिया या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. तर 147 कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे पूर्व दिल्लीचे उमेदवार हे आहेत. 102.59 कोटींची संपत्ती गुडगावमधून इंडियन नॅशनल लोकदलचे उमेदवार वीरेंद्र राणा यांच्याकडे आहे.

सहाव्या टप्प्यात चार असे उमेदवार आहेत, ज्यांच्याकडे 100 कोटींपेक्षा जास्त संपती आहे. भिवानी महेंद्रगड मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार श्रुती चौधरी यांच्याकडे 101.61 कोटींची संपत्ती आहे. हिसारचे खासदार दुष्यंत चौटाला 76.95 कोटींच्या संपत्तीसह या टप्प्यातील श्रीमंत उमेदवारांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत. बसपचे दीपक यादव यांच्याकडे 56.94 कोटींची संपत्ती आहे, तर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याकडे 55.69 कोटींची संपत्ती आहे. सोनीपतमधून निवडणूक लढत असलेल्या दुष्यंत चौटाला यांच्या भावाकडे 53.18 कोटींची संपत्ती आहे.

वडील माधवराव सिंधिया यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर ज्योतिरादित्य राजकारणात आले. मध्य प्रदेशातील गुना या मतदारसंघातून त्यांनी 2002 साली पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि निवडून आले. ते आतापर्यंत सलग चार वेळा निवडून आले आहेत. त्यांना 2012 ते 2014 या काळात यूपीए सरकारमध्ये मंत्रीपदही देण्यात आले होते. त्यांची आत्या वसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. तर यशोधरा राजे मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री होत्या.

Leave a Comment