यामुळे पाच राज्यांत नऊ ट्रक भरून ‘या’ अभिनेत्याने वाटले आईस्क्रीम


फक्त तेलगू सिनेसृष्टीच नाही तर देशभरातील नावाजलेल्या कलाकारांमध्ये सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा हे नाव आवर्जुन घेतले जाते. विजयने 9 मे रोजी त्याचा 30 वा वाढदिवस साजरा केला. त्याने चाहत्यांना आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास भेट दिली.

विजयने या उन्हाच्या दिवसांमध्ये आपल्या चाहत्यांसाठी नऊ ट्रक भरून आईस्क्रिम वाटले. एक, दोन नव्हे तर तब्बल हैदराबाद, विजयवाडा, तिरुपती, बंगळुरू, चैन्नई आणि कोची या पाच राज्यांमध्ये हे आईस्क्रिम वाटण्यात आले. हैदराबाद येथील बंजारा हिल्सच्या येथे विजयने स्वतः आईस्क्रिम वाटले. विशेष म्हणजे त्याने गेल्यावर्षीही सुमारे ४ ते ५ हजार आईस्क्रिम वाटले होते.

विजय देवरकोंडाचे नाव यावर्षी फोर्ब्सने जारी केलेल्या ३० वर्षांहून कमी श्रीमंत कलाकारांमध्ये आहे. विजयने गेल्या चार वर्षांत ‘पेली चुपूलु’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजयने एका मुलाखतीत म्हटले होते की, जेव्हा तो 25 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या बँक अकाउंटमध्ये 500 रुपयांपेक्षाही कमी रक्कम होती. यामुळे आँध्रा बँकेने त्याच अकाउंट लॉक केले होते आणि आता फोर्ब्स इंडियाच्या 30 वर्षांहून श्रीमंत कलाकारांमध्ये माझे नाव आहे.

Leave a Comment